स्वातंत्र्यापूर्वी व नंतर
या देशाला नेहमीच परकीयांपेक्षा अंतर्गत छुप्या शत्रूंचा धोका राहिलाय. मग ते
मुस्लीम असो, ख्रिश्चन असो वा वैदिक !
मुस्लीम – ख्रिस्त्यांची धर्म
– श्रद्धेय भूमी भारताबाहेर असल्याने त्यांच्या निष्ठा नेहमीच इथल्या तथाकथित
हिंदुत्ववादी, अर्थात वैदिकांनी समस्त भारतीयांसमोर संशयास्पद म्हणूनच प्रमोट
केलीय. परंतु वैदिकांच्या निष्ठेचे काय ? ज्यांना स्वतःचे मूळ अद्याप शोधता आले
नाही व पावसाळी छत्र्यांप्रमाणे त्यांच्या इथल्या अस्तित्व – आगमनाचे सिद्धांत वेळोवेळी
उदयास आले, मोडीत निघाले. हे नेमकं कशाचं प्रतिक आहे ? जैन, बौद्ध वा शिखांना का आपल्या
मुळाचा शोध घ्यायची गरज पडत नाही ? बहुसंख्य हिंदुनांही आपण मुळचे कोण आहोत, कोठून
आलो याचा शोध घ्यावा वाटत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपण मुळचे इथलेच ---
भूमिपुत्र असल्याचे त्यांना पक्के माहित्येय. तुलनेने वैदिकांची तऱ्हाच न्यारी.
निराळी !
या देशाशी ते कधीच समरस झाल्याचे
दिसून येत नाही. अर्थात, नियमाला अपवाद असतात त्याप्रमाणे काही सन्माननीय आहेत,
परंतु बहुसंख्याकांचे काय ? स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात यांचा सहभाग होता काय ?
द्विराष्ट्राचा, फाळणीचा धोका दिसत असताना आज अखंड हिंदुस्थानच्या घोषणा करणारा
वैदिक संघ कोणत्या बिळात लपून बसला होता ? काठ्यांना भाल्याची पाती जोडून त्यांना
रणात उतरण्यास कोणी आडकाठी केली होती ?
रझाकारांची जशी स्वयंसेवक पथकं उभारून फुटीरतावादी
मुस्लीम नंगानाच घालत होते, तो आवरण्यास यांना कोणी मज्जाव केला होता ?
द्विराष्ट्राच्या --- अर्थात भारताच्या फाळणीत निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन वैदिक
संघाने त्यांस एकप्रकारे संमतीच दिली व आपल्या हातून घडलेलं पाप झाकण्याकरता
म्हाताऱ्या गांधीला टारगेट करून त्याला उडवण्यात धन्यता मानली. याला म्हणतात
देशभक्ती !
म्हणे गांधी देशाचं वाटोळं
करत होता. मग तुम्ही काय करत होता ? गांधी देशाला विनाशाच्या खाईत लोटतोय हे
तुम्ही लोकांना सांगू शकला नाहीत ? का पटवून देऊ शकला नाहीत ? उलट त्या निःशस्त्र,
ढोंगी म्हाताऱ्याची आजही यांना इतकी दहशत, धास्ती आहे कि प्रसंगी त्याच्या छायाचित्रांमध्ये
गडबड करून मरणोत्तरही गांधीची विटंबना चालवलीय व हे पाप झाकायला वर त्याला
प्रातःस्मरणीयही ठरवलंय !
अर्थात तेही बरोबरच आहे
म्हणा ! निदान प्रातःस्मरणी गांधीची आठवण काढताना त्यानिमित्ताने त्यांना इतरही
बरंच काही पाहून घेण्याचा मोका साधता येतो. करणार काय ? शेवटी संकृती रक्षक ना !
खुलेआम अशा गोष्टी पाहू शकत नाहीत व न पाहता राहवतही नाही. असो.
फाळणीचा तमाशा मनसोक्त
पाहून, गांधीला गोळ्या घालून यांचे समाधान झाले ? बिलकुल नाही. मध्ययुगीन काळातील
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय स्थित्यंतरात अजाणते – जाणतेपणी हिंदू धर्माची व
वैदिकांची एकत्र गाठ बांधली गेल्याने हे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणवू
लागले होते. धर्म काय, समाज काय व त्याचे नियमन काय हे शास्त्रार्थ पाहून सांगण्याचा
अधिकार यांच्याकडे होता. गांधीच्या मरणानंतर आंबेडकराचा धर्मांतर मुद्दा समोर आला.
काय होती रे त्या
आंबेडकराची मागणी ? त्याला अन् त्याच्या बांधवाना हिंदू धर्मात इतरांप्रमाणे
सन्मानानेच वागवावे असेच तो म्हणत होता ना ? मग तुम्ही काय केले ?
अखंड हिंदुस्थानच्या बाता
हाणणाऱ्यांना ‘ हिंदू तितुका मेळवावा, हिंदू धर्म रक्षावा ‘ हे कधी ब्रीदवाक्य
मुळीच वाटले नाही. उलट ‘ हिंदू तितका घालवावा, हिंदू धर्म विध्वंसावा ‘ हेच यांचे
मुख्य उद्दिष्ट होतं व आहे.
आंबेडकराच्या धर्मांतराचे
परिणाम जाणूनही हे वैदिक झोपेचे सोंग घेऊन राहिले व त्यांच्या तालावर नाचणारे
बहुसंख्य हिंदूही कान, डोळे बंद करून व आपला बधीर मेंदू अधिक बधीर करून थंड पडून
राहिले. आंबेडकर व त्याचा समाज हिंदू धर्मातून बाहेर पडणे हे पर्यायाने हिंदू धर्म
व समाजाचेच नुकसान असल्याचे हिंदूंच्या ध्यानी कधीच आले नाही व आजही येत नाही.
त्याउलट वैदिकांच्या आत्मघाती सूत्रावर विसंबून ‘ मग कशाला हिंदू धर्मात राहता,
देशात राहता ‘ म्हणून आपल्याच बांधवांना लाथाडून त्याना परधर्मात पाठवण्यात ते
मश्गुल आहेत.
आज या लबाड वैदिकांनी
गाईंचे स्तोम माजवत तिला ‘ माता, आई ‘ असा भावनात्मक दर्जा देऊन हिंदूंची दिशाभूल
चालवलीय. अरे हिंदूंना तर प्रत्येक प्राणी पूज्य आहे. त्याला साप, बैल दिसताच शंकर
आठवतो. उंदीर पाहताच गणपती. घोड्यावर आरूढ झालेले तर आमच्यात खंडीभर देव आहेत. पण
म्हणून काही आम्ही साप, उंदरं मारणं बंद केलंय ?
आमच्या लेखी जे महत्त्व
सापाला, उंदराला तेच गाईला ! गाई दुध देते तर म्हैस काय निस्तं शेण देते ? आख्ख्या
गावाची घाण खाणाऱ्या गाईचे मलमूत्र खाऊ – पिऊन तुम्हांला पवित्र वाटत असेल. पण
पवित्र वाटायला, व्हायला आम्ही काय अपवित्र आहोत ?
सोवळ्या – ओवाळ्याच्या
निमित्ताने स्वतःच्या आई – बापापासून, मुला – लेकरांपासून अस्पर्श राहणारे तुम्ही अस्पृश्य.
तुम्हांलाच अशा शुद्धीकरणाची गरज अधिक आहे.
आमचा शेतकरी शेतीयोग्य
जनावरे कशी सांभाळतो व अगदीच अपरिहार्य झाल्यावर --- तेही अत्यंत गळ्याशी आल्यावर
--- तो जनावरं खाटकाला देतो. अशा आमच्या हिंदू शेतकऱ्यांना तुम्ही काय रे गोवंशाचे
व पालनाचे महत्त्व सांगणार ?
आणि महामूर्ख हिंदूंनीही
आता लक्षात घ्यावे कि, काही काळापूर्वी दारात मारून पडलेली जनावरं ओढून न्यायला
--- मग ती कशासाठी का असेनात --- तुम्हीच म्हारा – मांगाच्या हाता – पाया पडत होता
ना ? त्यावेळी आई, माता का तुम्हांला आठवत नव्हती ? खांद्यावर डोकं नावाचा अवयव
आहे, त्यातील मेंदूमधील बुद्धी नामक अदृश्य वस्तूला चालना दिल्यास सारे भ्रम
फिटतील. फक्त त्यांस थोडी बौद्धिक कसरत करावी लागेल. उठसुठ ब्राम्हणांनी आम्हांला
अज्ञानात ठेवल्याचा कांगावा करून तुम्हांला स्वतःची कातडी वाचवता येणार नाही.
कातडीवरुन आठवले. देशातील
एवढी अवाढव्य लोकसंख्या आपल्या नेहमीच्या व्यवहारात ज्या चामड्याच्या वस्तू
वापरते, ते चामडे नेमकं कशाचं असतं ? कोठून येतं ? त्यांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या
कंपन्या कुणाच्या आहेत ?
आहेत या प्रश्नांची उत्तरे ?
कशी असणार म्हणा ! उत्तरे माहिती असायला प्रश्न तर आधी पडायला पाहिजेत ना ?
आम्हांला प्रश्न पडतच नाहीत. म्हणून तर आम्ही सदा सुखी असतो. अक्कल नावाचा भाग
नाही. त्यामुळे कोणीही बोलघेवडा आमच्या डोक्यावर चढून बसतो. मग आमचा आवडता
कार्यक्रम सुरु होतो. उर बडवून घ्यायचा.
मग हि उरबडवेगिरी सुरु होते.
शेकडो, हजारो वर्षांची करूण कहाणी सांगितली जाते. कथा जितकी जुनी, तितका मोठा
आक्रोश !
स्वखुशीनं दारिद्र्यात,
अज्ञानात, गुलामीत पिचत राहायचं. स्वतःवरील अन्यायाच्या कथेत रममाण व्हायचं व
उद्धारकर्त्याच्या जन्माची वाट बघायची. तो जन्मला कि त्याला जिणं नकोसं करायचं व
मेला कि, पुतळे बांधून ‘ आमचा कैवारी कि हो गेला ‘ म्हणत गळा काढायचा. या पलीकडे
आम्ही केलंय तरी काय ? पूर्वीही तेच केलं, आजही तेच करतोय व पुढेही तेच करणार !
कारण, दुसरं तिसरं कोणी नाही तर आम्हीच आमच्या स्वातंत्र्याचे खरे शत्रू आहोत !!
Aho shirasagar ji tya vaidikana bajula rahudya. Je etar hindu ahet nidan tyana tari ek dilane raha mhanun jara sanga ki ho.
उत्तर द्याहटवा