बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

Disability : Physical or Mental





    बहोत पुरानी बात है. आज से ३० - ४० साल पहले... एक गृहस्थ माझ्या भेटीला आले होते. इतिहास आणि एकूणच साहित्य प्रकार तसेच साहित्यिक व त्यांचे स्वभाव यावर तीन - चार तास गप्पा झाल्या. नंतर थोडं खासगी विषयांवर बोलणं झालं व बोलता बोलता माझं लग्न झाल्याचं मी त्यांना सांगितलं. यानंतरचे त्यांचे उद्गार थोडे असंबंद्ध व तुटकच राहिले. कारण समोर व्हील चेयरवर बसलेला सांगतोय कि त्याचं लग्न झालंय. स्वाभाविक सर्वांच्याच मनी उद्भवणारा प्रश्न त्यांच्याही मनात निर्माण झाला कि, याचं सेक्शुअल लाईफ कसं असेल ? पण हे विचारायचं कसं ?


    माणसाचा चेहरा, डोळे, बॉडी लँग्वेज, मुव्हमेंट आणि त्याचे शब्द. यांपैकी शब्दांद्वारे मनुष्य खोटंही बोलू शकतो पण त्याची एकूण बॉडी लँग्वेज खोटं बोलत नाही. समोरच्या गृहस्थांच्या मनातील भाव ओळखायला मला वेळ लागला नाही. कारण लग्न झाल्यापासून जवळपास सर्वांच्याच चेहऱ्यावर लिहिलेला हा प्रश्न मी वाचला होता.


    वास्तविक मला स्वतःला लग्न होईपर्यंत सेक्शुअल रिलेशन्स बद्दल फारशी माहिती नव्हती. अपवाद काही पुस्तकं व पोर्न मुव्हीज. पण यामध्ये सो कॉल्ड disablle पर्सनच्या सेक्स लाईफबद्दल काहीच नसतं. त्यामुळे लग्न झाल्यावर सुरवातीला प्रॉब्लेम यायचा तो आलाच. वो भी अंजान, और हम भी !


    पण नेहमीप्रमाणे गुरुवर्य श्री. सोनवणी मदतीस आले. त्यांचा सल्ला व अनुभवांती येणारं ज्ञान यामुळे ह्याही अडचणीवर मात केली खरी पण नंतर लक्षात आलं कि मुळात अडचणच कुठे होती ? खरं तर काहीच अडचण नव्हती. काही प्रॉब्लेम नव्हता. पण आपली मानसिकता व काही विषयांवर उघड न बोलण्याची आपली थर्डक्लास मर्यादा. यामुळे बराच घोटळा झाला. लोकं सेक्शुअल लाईफमध्ये मेंटली कसे खच्ची होतात याचा यानिमित्ताने अल्पसा का होईना अनुभवही आला.


    सो कॉल्ड नॉर्मल पर्सनसाठी सेक्शुअल गाईडमध्ये लेख, क्लिप देशी भाषांत इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण तेच सो कॉल्ड disable पर्सनसाठी म्हणता येत नाही. कारण आपल्याकडे मुळात disable पर्सनलाही फिलिंग्ज ऑर सेक्शुअल लाईफ असते हेच मुळी मान्य नाही. नेहमी ह्या ना त्या कारणांनी पाश्चात्त्यांवर तोंडसुख घेणाऱ्या आपल्या देशीवाद्यांनीही याबाबतीत काही मौलिक, भरीव कार्य केल्याचे मला तरी आढळून आले नाही. आपल्याकडचा एकमेव सेक्सॉलॉजिस्ट म्हणजे वात्स्यायन. त्याने याबाबतीत काय लिहिलंय ते माहिती नाही पण त्यानंतर बराच काळ, युग उलटून गेलंय. पण अजूनही याबाबतीत अंधारच.


    इंटरनेटवर किमान काहींनी या विषयावर मराठीत लेखन केलं असेल म्हणून तेव्हाही व आजही मी मराठीत सर्च करून बघतो तर अपंगांसाठीच्या शासकीय योजनांपलीकडे काही सापडत नाही. लेखनाची हि बोंब. मग व्हिडीओ वगैरे तर दूर कि बात ! सरतेशेवटी इंग्रजीचा सहारा. तो मात्र कधी दगा देत नाही. पॅरेलिसीस, स्पायनल इंजरी झालेल्या, कंप्लीट बेडरेस्टवर असलेल्या व्यक्तीलाही त्याचे सेक्स लाईफ कसे जगता येईल याकरता पाश्चात्त्यांनी घेतलेली मेहनत, संशोधन खरोखर थक्क करण्यासारखं आहे. हि संशोधनं केवळ समाजसेवेसाठीच आहेत असं नाही. व्यावसायिक वृत्ती जरूर असू शकते पण सेक्शुअल अॅक्टीव्हीटीसाठी चेयर बनवण्याची कल्पकता जिवंत मनाची माणसंच दाखवू शकतात. ज्या चेयरवर अवघड वाटणाऱ्या क्रियाही disabl पर्सन करू शकतात. हां, आता एक फरक मात्र आहे. तिथे बऱ्याचदा हेच गृहीत धरलं जातं कि disabl पर्सन सोबत non disabl ऑर नॉर्मल पर्सन लाईफ पार्टनर असेल. हि तिथली वास्तविकताही असेल. पण आपल्याकडे तसं नाही. सामान्यतः disabl पर्सनने disabl व्यक्तीशीच लग्न करावे किंवा करुच नये असे टोकाचे मतप्रवाह आहेत. पैकी दुसरा तर अधिक. दोन्ही मतवादी पाहिले. ऐकले.
 
    आपण घट्ट मनाचे. अगदी निगरगट्ट. त्यामुळे आपल्यावर याचा थेट इफेक्ट होत नाही. पण इनडायरेक्टली कुठेतरी धक्का बसतोच. topic खूप मोठा न् गंभीर आहे. पण यात लिहिण्यासारखंही काही नाही. कारण जिवंत माणसाला सांगावं लागत नाही व मेलेल्यांचा तर प्रश्नच नाही !