सोमवार, १७ जुलै, २०१७

प्रासंगिक (१)




    सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील अन्याय नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेषतः स्त्रियांवरील अत्याचार !

    कोणत्याही वयोगटातील स्त्रिया, मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी, झाल्यास गुन्हेगारांना जरबपूर्वक शासन मिळावे यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदेही केले. परंतु वास्तविकता काय आहे ? सरकारी आकडेवारी सहसा स्थितीचं गांभीर्य जाणवू नये यादृष्टीने बनलेली असते. त्यातही उघडकीस येणारे प्रकार व त्यांची दखल हि देखील एक महत्त्वाची बाब आहेच. परंतु या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेणे अत्यावश्यक आहे व तो म्हणजे स्त्रियांवरील अत्याचारास प्रतिबंधात्मक कायद्यांचा होणारा गैरवापर !

    वयाने सज्ञान असलेली व्यक्ती संमतीने शरीरसंबंध ठेवते, लग्न होईल या आशेवर, तर त्यांस बलात्कार म्हणता येत नाही असं नुकतंच कोणत्या तरी कोर्टाने असं आपलं मत नोंदवलं होतं. परंतु कोर्टाच्या लक्षात हि बाब येईपर्यंत किती निरपराध जीव यात भरडले असतील ? त्यांच्या नुकसानीची परतफेड कशी केली जाईल ?

    दुसरा एक ट्रेंड आहे कौटुंबिक अत्याचार वगैरे नियमांचा. याचा अक्षरशः सदुपयोग करत लग्न होताच चारआठ दिवसांच्या आत केसेस दाखल होऊन भरभक्कम आर्थिक फायदा पदरात पडून घेत मांडवली केली जाते. कारण या कलमांची व्याप्तीच इतकी मोठी आहे कि, यास्वारे समस्त कुटुंब देशोधडीला लागू शकते.

    कायदेनिर्मिती मागील हेतू मुळात अपराध घडल्यास त्यांस शासन करणे, पिडीताला न्याय देणे हा असतो. त्याचा लाभ कोण कसा घेतो याची त्यावेळी कोणालाच कल्पना नसते. परंतु काही व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कार्यासाठी खरोखरच अत्याचार पीडितांच्या सहाय्यार्थ बनवलेल्या कायद्याचा दुरुपयोग करते तेव्हा त्या कायद्याद्वारे नडल्या जाणाऱ्या कुटुंबाचे काय करायचं ?

    घडल्या घटनेची व्यवस्थित माहिती, चौकशी केल्यावर पोलिसांना गुन्हा नोंदवण्या - न नोंदवण्याचे अधिकार आहेत परंतु कित्येकदा ' सहानुभूती ' लाटेच्या दडपणाखाली येऊन ते देखील आपली जबाबदारी झटकून एकप्रकारे रिकामे होतात.

    म्हणजे कायद्याद्वारे नडल्या जाणाऱ्या व्यक्तीने आपण निरपराधी आहोत हे सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे खेटे घालायचे, त्यातही निकाल वगैरे सन्माननीय न्यायाधीशांच्या वर्जीव्र अवलंबून असतात. नाहीतर तारखाच पदरात पडतात. कसलाही अपराध नसता सरकारी कागदपत्रांत गुन्हेगार, अपराधी म्हणून स्वतःची नोंद लागलेली बघायची हा एकप्रकारे मानसिक छळच नाही का ? अशा प्रकारच्या न्यायालयीन तसेच स्वार्थमूलक व्यक्तीकडून होणाऱ्या छळास प्रतिबंध करणारी तरतूद नाही का ? खोट्या केसेस दाखल करणाऱ्यास कठोरात कठोर शिक्षा देण्याची तरतूद करता येणार नाही का ? तसेच अशा प्रकारचे डावे अल्पावधीत निकाली काढण्याची काही एक व्यवस्था करणे शक्य आहे का ?
जर नसेल किंवा करता येत असूनही केली जात नसेल तर या न्यायालयीन अन्याय, अत्याचाराबाबत दोषी कोणास धरावे ?

    कायदे नेहमी दुर्बलांच्या रक्षणार्थ केले जात असतात हे जरी खरं असलं तरी दुर्बलतेची नेमकी व्याख्या काय आहे ? आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक कि बौद्धिक ? व्यक्ती बौद्धिकतः सबल असली व इतर घटक जरी दुर्बल असले तरी तिने कायद्याचा वापर आपल्या मतलबास्तव केल्यास त्यांस आळा कसा घालणार ? गेल्यावर्षी अॅट्रोसिटी कायद्यासंबंधात अशीच ओरड झाली होती. परंतु त्यात निव्वळ कायद्यातील त्रुटी दाखवण्याखेरीज इतर घटकांची अधिक भर असल्याने ती तितकीच राहिली. स्त्रियांसाठीच्या कायद्यांबद्दलही तसेच आहे.

    स्त्री या गटात मोडणाऱ्या सर्व वयोगटातील घटकांचे लैंगिक शोषण हा एक संवेदनशील विषय आहे. उपलब्ध माहिती पाहता सार्वजनिक जीवनातच नव्हे तर घरातही  स्त्री घटक असुरक्षित असल्याचे दिसून येते. कित्येकांना हा काल्पनिक आविष्कार वाटेल परंतु फक्त स्त्री हा घटकच नव्हे तर या घटकाची बाह्य तसेच अंतर्वस्त्रे देखील असुरक्षित असल्याचे आढळून येते. पुरुषांची स्वैर लैंगिकता तसेच यासंबंधीची उपासमार यावरून लक्षात यावी कि, कित्येकजण गाड्यांच्या सायलेन्सर पाईपही शमनार्थ वापरतात. स्वैर, अनिर्बंध लैंगिकता तसेच यासंबंधी असुरक्षितता हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. इथे प्रश्न आहे स्त्री संरक्षणार्थ कायदे व त्यांच्या उपयोगाचा.

    हल्ली सोशल मिडीयावर विशिष्ट घटक, व्यक्ती, पक्ष, संघटनेच्या विरोधात एखाद्या क्षेत्रातील यशस्वी, कर्तृत्ववान स्त्रीने टिपण्णी केली तर इतरवेळी उदात्त, थोर भारतीय संस्कृतीचे, स्त्री दाक्षिण्य, पावित्र्य, भारतीय स्त्री संस्कृतीची महती गाणारे सुसंस्कारी पुरुष शब्दांद्वारे त्या स्त्रीवर कसा बलात्कार करतात हे काही कोणापासून लपलेलं नाही. खरंतर अशा स्थानीही स्त्री संरक्षणार्थ कायद्यांचा वापर केला जाऊ शकतो. परंतु होतो का ? अशा शाब्दिक बलात्काऱ्यांना फेस करणारी स्त्री स्वबळावर त्यांचा प्रतिवाद करून त्यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न करत आपल्या बौद्धिक, वैचारिक, मानसिक बळाचं दर्शन घडवते व हे कितीही योग्य असलं तरी अशा प्रवृत्तीला कायदेशीर चाप लावून व्यक्ती तसेच समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करण्याचे ती टाळते हेही तितकंच अयोग्य आहे. कारण क्षणिक भावनेपोटी स्त्रीवर अत्याचार करणारी व्यक्ती आणि वैचारिक माध्यमातून तिच्यावर शाब्दिक बलात्कार करणारी व्यक्ती यांत जमीनअस्मानचा फरक असतो. प्रथम घटकातील व्यक्ती विकाराची बळी असते तर दुसऱ्या गटातील विचारांची ! प्रश्न असा आहे कि, आपणांला विकारांना आळा घालायचा आहे कि विचारांना ?

बुधवार, १२ जुलै, २०१७

संवाद कथालेखनाचा एक प्रयत्न



" दादा .. .."
" .... "
" घरात थोडी अडचण होती ..'
" .. "
" थोडी पैशांची नड आहे ..."
" ... "
" एक चार दिवसांत मी परत देईन ... "
" ... "
" लय नाही एक दोन .. तीन .. हजा.. .. .. काम झाल्याव लगीच ... "
" .. "
" पोरांच्या अॅडमिशनला पाहिजं व्हतं. .. वाटलं तर मी परत आणून दिती ..."
" व्हय "
" नाय म्हनू नगंसा .. लेकरांच्या शिक्षणाला .."
" कश्शाला आय निजवायला पिल्लं काढायची ? "


" ... ”
" चार दिसांत आनून देतो म्हन्तुस .. आसं किती रं आनून दिलंस ? .. हिच्या बरोबर लगीन करायच्या आधी धंदा काढून दिला तर मांगवड्यातील पुर्गी घिऊन धंदा बुडवून बसलास. चार दोन जनाच्या हातापाया पडून ती भानगड मिटवली. पुन्हा तुझ्या आईच्या शब्दाखातर पोल्ट्री फार्मात चिटकवला तर तिथल्या कोंड्या चोरून विकल्यास. काम ना धाम, वरनं त्यो दारूचा नाद. ... .. तुझ्या आयला म्हटलं, नको त्येचं लगीन करूस तर तिनं नाय ऐकलं. ... ... बायको करायची ती केलीस वर आनखी आय झवायला कार्टी काढलीस. त्या लेकराबाळांकडं बघून कारखान्यात लावला तर तिथं पिऊन गु खाल्लास. गावात धा जणास्नी धा कारणं सांगून माझ्या नावाव पैसा उकळलास ते अजून मी फेडतोय. त्या टायमाला गावातल्यांनी उचलून घातला असता ... आणि वर आता पोरांच्या शिक्षणाचं सांगून .. "
" आवं पन .."
" तू गप गं ! एक शब्द बोलू नकोस .. का रं ? आता का खाली मान घातलीस ? .. बघ हिकडं नजर वर करून. थोबाड वाकडं करू नकोस. .. .. आन तू गं ए भवाने .. पोरास्नी चिमटं काढून रडवायची नाटकं इथं करु नकोस .. हि बघ रं ... हि पाच हजार रुपये मी देतोय .. थांब .. आधी ऐकून घे. .. पैसे घ्यायचं आन् मुकाट्यानं पोरं उचलून चालायला लागायचं. "
" लय उपकार झालं तुमचं. "
" तुला सांगितल्यालं ऐकू येत न्हाय काय ? का दारूनं डोस्क्याबरुबर कानबी नासलेती ? पैशे न् फक्त न्यायची. तिला इथंच ठेवायचं ! "
" आसं टवकारून बघायला काय झाल ? लय काय वंगाळ सांगत न्हाय मी. ह्ये पैसं घिऊन जा. मागलं पण मागत नाही. हिला आज राती ... "
" दादा ss "
" ए ..आवाज चढवायचं काम न्हाय. गपगुमान सांगतोय ती ऐकायचं. हि रातच्यालं इथंच राहील.  आन् तू गं ए भावाने , उद्या सकाळ झाली कि घरचा रस्ता धरायचा. उगा जीव घेतल्यागत बोंबलायचं काम नाय. समजलं ? "
" आरं ए गतकाळीच्या .. उचल पोरास्नी न् घिऊन जा पटकिरनं .. मला रातभर ह्योच तमाशा बगायला टाईम नाही. "

-----------
" रातभर काय इथंच रडत बसणार हाईस् ? गुपगुमान आत चल. आख्ख्या गावाकडनं हेपलून घ्याला नाय सांगत तुला ...  रडायचं काम न्हाय. आवाज बंद. डोळं पूस न् पड तिथं मुकाट्यानं .. .. आगं ए ... तुझ्या बानं पाताळाव झवली व्हती का ? कर कि वर ... "
----------

" .. तर आज या ठिकाणी या समाजमंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आपल्यातील धडाडीचे समाजसेवक आयु. रविराज काळेसाहेब यांना मी इथे आमंत्रित करत आहे. मला सांगायला आनंद वाटतं कि, या समाजमंदिराच्या बांधणीसाठी काळे साहेबांनी सुमारे पन्नास हजाराचा निधी खर्च केला आहे. "
" सर्वप्रथम, सर्वांना माझा जयभीम ! ... "
----------

" म्हादू "
" जी दादा .."
" कार्यक्रम कसा झाला ? "
" जी, चांगलाच झाला कि म्हनायचा. तुमचं नि मास्तरांचं भाषण चांगलं जमलं व्हतं .."
" त्ये नाही रं .."
" मग .."
" संब्या "
" जी मालक "
" गाडी जुन्या घराकडं घी. "
" व्हय जी "
" म्हाद्या तू पुढं कोपऱ्याव उतर न् रातच्याला ये. आपण बसू. .. .. संब्या कोपऱ्याव गाडी थांबव म्हजी झालं. "
-----------

" संब्या "
" जी "
" घरात कोण आसल त्येला बोलवून आन."
" व्हय जी. "
" घरात कुनी न्हाय. "
" कुनी न्हाय ? मग हि पोरं दारात खेळत्येती त्येचं काय ? "
" जी तसं न्हाय .. म्हंजी राजाभाऊ घरात न्हायती. फकस्त वैनीसाब हैत. त्यास्नी बरं न्हाय म्हनून पडल्येत्या."
" आस्सं ! तू थांब इथंच. "

" काय गं ! काय होतंय तुला ? "
" .. "
" संब्या म्हनत हुता बरं न्हाय म्हनून ! "
" .. "
" बोल की ! का बोलाय पैकं पडत्येती ? "
" .. "
" हम्म ... ठीक हाय. रात्री थोडं जास्त झालं. पन आज नाही होणार. दुपारी घरी ये. "
" मला बरं न्हाय .. "
" आँ .. काय म्हनलीस ? "
" मला बरं नाय. "
" बरं नाय म्हणाया बरा जोर येतोया ! ते काही नाही. आज दुपारी नसलं तरी रातच्याला याचं. पैश्यापान्याची काळजी करायचं काम नाय. तुझा सगळा खर्च मी चालवीन. लागेल ते पुरवीन. ... "
" रांड म्हनून ? "
" नाय रखेल म्हणून ! तू काय काळजी करू नकोस. कुंकवाचा धनी त्योच राहील. नांदवना तर मला सांग. पाय मुडून घरात बसवतो. त्याची काळजी बाळगू नको. फक्त मी सांगेन तेव्हा यायचं, जायचं. समजलं ? "
" .. "
" ठीक आहे. वाट बघीन रातच्याला. "

" संब्या, तू आता घरला जा. गाडी मी घेतो न् त्या म्हाद्याला म्हनाव आज रातचा प्रोग्राम कॅन्सल. परत बघू. "
" जी मालक. "
 -------------

" आलीस ! ये बस अशी इथं बाजूला. "
" नको. मी इथंच ठीकाय. "
" जशी तुझी मर्जी. "
" राजा काय बोलला का ? "
" ... "
" त्यानं विचारलं नाय, कुटं जाती म्हनून ? "
" विचारलं व्हतं. "
" मग ? "
" तुमचं नाव सांगितल्याव गप बसलं. "
" नुसता गप बसला ? काय बोलला न्हाय ? "
" ...."
" हम्म .. बरं, जेवणखाणं झालं का ? "
" .. "
" मी काय इचारतुय ? तोंडानं सांग. "
" व्हय झालं. "
" नक्की न्हव का ? "
" होय. "
" मग आवाजात जोर का नाय ? जा पैलं घरात जाऊन खाऊन घे. "
" जी, नगं. "
" आगं जा की ! परत आत गेल्याव मी तुला काय सोडणार हाय वी ! "
" खरंच नकू "
" आगं जा गं ! ह्ये बग .. मी काय तेवढा वायट माणूस नाय. आपलं जी काय हाय ती व्येवारानं हाय. यात तुझा काय बी दोष न्हाय. जे काय घडतं ते घडायचंच असतं. .. चल उठ .. "
------------------

" कुटं गेली व्हतीस ? "
" भावजींच्या घरी."
" तुला सांगितलं न्हाय का .. तिकडं जायाचं न्हाय म्हनून ! "
" न जाऊन कुनाला सांगता .."
" जी काय हुईल ते मी बगून घीन म्हनून सांगितलं न्हव .. "
" व्हय बगून घेतायसा .. त्या दिशी भाऊजी एवढं तडातडा बोललं .. काय केलंसा ? .. बायकू ठीउन जा म्हनल्याव पोरं घिऊन गेलासा .. "
" तुझ्या तर .. "
" मारा .. मारा मला .. पन मारून झालेलं परत येनार न्हाय .. तुमच्या करनीनं समदं गाव उराव घिऊन पडायची येळ आली. काढलेल्या पोरास्नी ... "
" गतकाळे .. पोरं काय मलाच पायजे व्हती? तुला नको व्हती का ? तवा कशी तंगड्या पसरून घेत हुतीस .... "
" व्हय .. घेत हुती. मग आताबी घितीयाच की .. तंगड्या पसरून .."
" तुझ्या आयच्या गांडीत पाय घातला .. छिनाल .. रांड .. माझ्या पुढं त्वांड वाजवती .."

" राजा ss .. हात आवरायचा. बाया मानसाव हात उचलायची आपल्यात रीत नाय. "
" दादा तू हितनं जा. आज या रांडंला मी जीत्ती ठेवत नाय. "
" संब्या दे रं दोन झणूटं त्येला .. झवणीचं शुद्धीवर नाय. "
" दादा तुमी आला ते बरं झाल. न्हायतर हे दारुडं .. "
" आरं पण मी येईपर्यंत तुमी काय करत हुतासा ? दोन मुस्काडीत दिऊन गप बसवायचा न्हाय का ? "
" आवं पन .. "
" गप बसा. नुसता तमाशा बगायला जमा व्हतासा. .. चला जावा आपापल्या घरला. "
" आरं ए संब्या .. आलं का ते शुद्धीव .. "
" जी याला लागलंय. "
" घाल त्येला गाडीत. पोरास्नी बशीव. तोवर मी वैनीला घिऊन येतो. आज राती इथं ठेवाय नको. हि बेनं काय भरवशाचं नाय. "
--------------

" उतरली का रं तुझी रातची ? "
" .. "
" भडव्या मी तुला इचारतूया, भिताडाला न्हाय ? "
" व्हय. "
" बरं, मग ऐक ! हितनं पुढं बायकापोरांव हात उचलायचा न्हाय. घरात काय लागलं सवरलं तर मी देत जाईन. तुझ्या रोजच्या बाटलीचं बी पैसे देईन. फक्त मी बोलवीन तेव्हा गपगुमान सुमीला पाठवून द्याचं. ... कळलं का ? "
" य् "
" आरं मोट्यानं बोल कि. "
" होय "
" सुमे .. '
" जी "
" हे बघ. ह्याला ताकीद किलिया. पन ह्येजा मला भरवसा नाय. तवा आजपास्नं तुमी सगळी इथंच ऱ्हायाचं. मागच्या बाजूला दोन खोल्या हैत. त्या तुम्हांला बास हायती. दुपारी संब्याला सांगून सगळं समान हलवतो. .. तू त्येच्या बरोबर जा रं आन् गप सगळी गठळी वळकटी बांधून इकडं ये. .. कळलं ?
" हम्म "        
                                                      

                                                      ( समाप्त )