" दादा ..
.."
" .... "
" घरात थोडी
अडचण होती ..'
" .. "
" थोडी पैशांची
नड आहे ..."
" ... "
" एक चार
दिवसांत मी परत देईन ... "
" ... "
" लय नाही एक
दोन .. तीन .. हजा.. .. .. काम झाल्याव लगीच ... "
" .. "
" पोरांच्या
अॅडमिशनला पाहिजं व्हतं. .. वाटलं तर मी परत आणून दिती ..."
" व्हय "
" नाय म्हनू नगंसा
.. लेकरांच्या शिक्षणाला .."
" कश्शाला आय
निजवायला पिल्लं काढायची ? "
" ... ”
" चार दिसांत
आनून देतो म्हन्तुस .. आसं किती रं आनून दिलंस ? .. हिच्या बरोबर लगीन करायच्या
आधी धंदा काढून दिला तर मांगवड्यातील पुर्गी घिऊन धंदा बुडवून बसलास. चार दोन
जनाच्या हातापाया पडून ती भानगड मिटवली. पुन्हा तुझ्या आईच्या शब्दाखातर पोल्ट्री
फार्मात चिटकवला तर तिथल्या कोंड्या चोरून विकल्यास. काम ना धाम, वरनं त्यो दारूचा
नाद. ... .. तुझ्या आयला म्हटलं, नको त्येचं लगीन करूस तर तिनं नाय ऐकलं. ... ...
बायको करायची ती केलीस वर आनखी आय झवायला कार्टी काढलीस. त्या लेकराबाळांकडं बघून
कारखान्यात लावला तर तिथं पिऊन गु खाल्लास. गावात धा जणास्नी धा कारणं सांगून
माझ्या नावाव पैसा उकळलास ते अजून मी फेडतोय. त्या टायमाला गावातल्यांनी उचलून
घातला असता ... आणि वर आता पोरांच्या शिक्षणाचं सांगून .. "
" आवं पन
.."
" तू गप गं !
एक शब्द बोलू नकोस .. का रं ? आता का खाली मान घातलीस ? .. बघ हिकडं नजर वर करून.
थोबाड वाकडं करू नकोस. .. .. आन तू गं ए भवाने .. पोरास्नी चिमटं काढून रडवायची
नाटकं इथं करु नकोस .. हि बघ रं ... हि पाच हजार रुपये मी देतोय .. थांब .. आधी
ऐकून घे. .. पैसे घ्यायचं आन् मुकाट्यानं पोरं उचलून चालायला लागायचं. "
" लय उपकार
झालं तुमचं. "
" तुला
सांगितल्यालं ऐकू येत न्हाय काय ? का दारूनं डोस्क्याबरुबर कानबी नासलेती ? पैशे
न् फक्त न्यायची. तिला इथंच ठेवायचं ! "
" आसं टवकारून
बघायला काय झाल ? लय काय वंगाळ सांगत न्हाय मी. ह्ये पैसं घिऊन जा. मागलं पण मागत
नाही. हिला आज राती ... "
" दादा ss
"
" ए ..आवाज
चढवायचं काम न्हाय. गपगुमान सांगतोय ती ऐकायचं. हि रातच्यालं इथंच राहील. आन् तू गं ए भावाने , उद्या सकाळ झाली कि घरचा
रस्ता धरायचा. उगा जीव घेतल्यागत बोंबलायचं काम नाय. समजलं ? "
" आरं ए गतकाळीच्या
.. उचल पोरास्नी न् घिऊन जा पटकिरनं .. मला रातभर ह्योच तमाशा बगायला टाईम नाही.
"
-----------
" रातभर काय इथंच
रडत बसणार हाईस् ? गुपगुमान आत चल. आख्ख्या गावाकडनं हेपलून घ्याला नाय सांगत तुला
... रडायचं काम न्हाय. आवाज बंद. डोळं पूस
न् पड तिथं मुकाट्यानं .. .. आगं ए ... तुझ्या बानं पाताळाव झवली व्हती का ? कर कि
वर ... "
----------
" .. तर आज या
ठिकाणी या समाजमंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आपल्यातील धडाडीचे समाजसेवक आयु.
रविराज काळेसाहेब यांना मी इथे आमंत्रित करत आहे. मला सांगायला आनंद वाटतं कि, या
समाजमंदिराच्या बांधणीसाठी काळे साहेबांनी सुमारे पन्नास हजाराचा निधी खर्च केला
आहे. "
" सर्वप्रथम,
सर्वांना माझा जयभीम ! ... "
----------
" म्हादू
"
" जी दादा
.."
" कार्यक्रम
कसा झाला ? "
" जी, चांगलाच
झाला कि म्हनायचा. तुमचं नि मास्तरांचं भाषण चांगलं जमलं व्हतं .."
" त्ये नाही रं
.."
" मग .."
" संब्या "
" जी मालक
"
" गाडी जुन्या
घराकडं घी. "
" व्हय जी
"
" म्हाद्या तू
पुढं कोपऱ्याव उतर न् रातच्याला ये. आपण बसू. .. .. संब्या कोपऱ्याव गाडी थांबव
म्हजी झालं. "
-----------
" संब्या
"
" जी "
" घरात कोण आसल
त्येला बोलवून आन."
" व्हय जी.
"
" घरात कुनी
न्हाय. "
" कुनी न्हाय ?
मग हि पोरं दारात खेळत्येती त्येचं काय ? "
" जी तसं न्हाय
.. म्हंजी राजाभाऊ घरात न्हायती. फकस्त वैनीसाब हैत. त्यास्नी बरं न्हाय म्हनून
पडल्येत्या."
" आस्सं ! तू
थांब इथंच. "
" काय गं ! काय
होतंय तुला ? "
" .. "
" संब्या म्हनत
हुता बरं न्हाय म्हनून ! "
" .. "
" बोल की ! का
बोलाय पैकं पडत्येती ? "
" .. "
" हम्म ... ठीक
हाय. रात्री थोडं जास्त झालं. पन आज नाही होणार. दुपारी घरी ये. "
" मला बरं
न्हाय .. "
" आँ .. काय
म्हनलीस ? "
" मला बरं नाय.
"
" बरं नाय
म्हणाया बरा जोर येतोया ! ते काही नाही. आज दुपारी नसलं तरी रातच्याला याचं.
पैश्यापान्याची काळजी करायचं काम नाय. तुझा सगळा खर्च मी चालवीन. लागेल ते पुरवीन.
... "
" रांड म्हनून
? "
" नाय रखेल
म्हणून ! तू काय काळजी करू नकोस. कुंकवाचा धनी त्योच राहील. नांदवना तर मला सांग.
पाय मुडून घरात बसवतो. त्याची काळजी बाळगू नको. फक्त मी सांगेन तेव्हा यायचं,
जायचं. समजलं ? "
" .. "
" ठीक आहे. वाट
बघीन रातच्याला. "
" संब्या, तू
आता घरला जा. गाडी मी घेतो न् त्या म्हाद्याला म्हनाव आज रातचा प्रोग्राम कॅन्सल.
परत बघू. "
" जी मालक.
"
-------------
" आलीस ! ये बस
अशी इथं बाजूला. "
" नको. मी इथंच
ठीकाय. "
" जशी तुझी
मर्जी. "
" राजा काय
बोलला का ? "
" ... "
" त्यानं
विचारलं नाय, कुटं जाती म्हनून ? "
" विचारलं
व्हतं. "
" मग ? "
" तुमचं नाव
सांगितल्याव गप बसलं. "
" नुसता गप
बसला ? काय बोलला न्हाय ? "
" ...."
" हम्म .. बरं,
जेवणखाणं झालं का ? "
" .. "
" मी काय
इचारतुय ? तोंडानं सांग. "
" व्हय झालं.
"
" नक्की न्हव
का ? "
" होय. "
" मग आवाजात
जोर का नाय ? जा पैलं घरात जाऊन खाऊन घे. "
" जी, नगं.
"
" आगं जा की !
परत आत गेल्याव मी तुला काय सोडणार हाय वी ! "
" खरंच नकू
"
" आगं जा गं !
ह्ये बग .. मी काय तेवढा वायट माणूस नाय. आपलं जी काय हाय ती व्येवारानं हाय. यात
तुझा काय बी दोष न्हाय. जे काय घडतं ते घडायचंच असतं. .. चल उठ .. "
------------------
" कुटं गेली
व्हतीस ? "
" भावजींच्या
घरी."
" तुला
सांगितलं न्हाय का .. तिकडं जायाचं न्हाय म्हनून ! "
" न जाऊन
कुनाला सांगता .."
" जी काय हुईल
ते मी बगून घीन म्हनून सांगितलं न्हव .. "
" व्हय बगून
घेतायसा .. त्या दिशी भाऊजी एवढं तडातडा बोललं .. काय केलंसा ? .. बायकू ठीउन जा
म्हनल्याव पोरं घिऊन गेलासा .. "
" तुझ्या तर ..
"
" मारा .. मारा
मला .. पन मारून झालेलं परत येनार न्हाय .. तुमच्या करनीनं समदं गाव उराव घिऊन पडायची
येळ आली. काढलेल्या पोरास्नी ... "
" गतकाळे ..
पोरं काय मलाच पायजे व्हती? तुला नको व्हती का ? तवा कशी तंगड्या पसरून घेत हुतीस
.... "
" व्हय .. घेत
हुती. मग आताबी घितीयाच की .. तंगड्या पसरून .."
" तुझ्या
आयच्या गांडीत पाय घातला .. छिनाल .. रांड .. माझ्या पुढं त्वांड वाजवती .."
" राजा ss ..
हात आवरायचा. बाया मानसाव हात उचलायची आपल्यात रीत नाय. "
" दादा तू
हितनं जा. आज या रांडंला मी जीत्ती ठेवत नाय. "
" संब्या दे रं
दोन झणूटं त्येला .. झवणीचं शुद्धीवर नाय. "
" दादा तुमी
आला ते बरं झाल. न्हायतर हे दारुडं .. "
" आरं पण मी
येईपर्यंत तुमी काय करत हुतासा ? दोन मुस्काडीत दिऊन गप बसवायचा न्हाय का ? "
" आवं पन ..
"
" गप बसा.
नुसता तमाशा बगायला जमा व्हतासा. .. चला जावा आपापल्या घरला. "
" आरं ए संब्या
.. आलं का ते शुद्धीव .. "
" जी याला
लागलंय. "
" घाल त्येला
गाडीत. पोरास्नी बशीव. तोवर मी वैनीला घिऊन येतो. आज राती इथं ठेवाय नको. हि बेनं
काय भरवशाचं नाय. "
--------------
" उतरली का रं
तुझी रातची ? "
" .. "
" भडव्या मी
तुला इचारतूया, भिताडाला न्हाय ? "
" व्हय. "
" बरं, मग ऐक !
हितनं पुढं बायकापोरांव हात उचलायचा न्हाय. घरात काय लागलं सवरलं तर मी देत जाईन.
तुझ्या रोजच्या बाटलीचं बी पैसे देईन. फक्त मी बोलवीन तेव्हा गपगुमान सुमीला पाठवून
द्याचं. ... कळलं का ? "
" य् "
" आरं मोट्यानं
बोल कि. "
" होय "
" सुमे .. '
" जी "
" हे बघ.
ह्याला ताकीद किलिया. पन ह्येजा मला भरवसा नाय. तवा आजपास्नं तुमी सगळी इथंच ऱ्हायाचं.
मागच्या बाजूला दोन खोल्या हैत. त्या तुम्हांला बास हायती. दुपारी संब्याला सांगून
सगळं समान हलवतो. .. तू त्येच्या बरोबर जा रं आन् गप सगळी गठळी वळकटी बांधून इकडं
ये. .. कळलं ?
" हम्म "
( समाप्त )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा