फिल्मी रोमान्स !
आपल्याकडे जो फिल्मी रोमान्स
दाखवला जातो त्यातला बटबटीत, किळसवाणा प्रकार सोडला तर निखळ रोमँटिक सीन असलेले
पाच चित्रपट सांगा, असे म्हटल्यास तुम्ही सांगू शकाल का ?
पहले जमाने में फुटभर पट्टीसे
अंतर मोजके, सुरक्षित अंतर रखके, पेड कि डाल पकडके रोमान्स होता था असं कोणीतरी
पिकल्या केसांसहित मिटल्या डोळ्यांनी सांगेलही पण हे खरं नाही. गुजरे जमाने की
मशहूर अभिनेत्री देविकाराणी व कुठल्या तरी रॉयचं चुंबनदृश्य कलरलेस जमान्यात येऊन
गेल्याचं सांगितलं तर विश्वास बसेल ? मला वाटतं सेन्सॉर बोर्ड त्यानंतरच कामाला
लागलं. त्यामुळं भली मोठी झाडं व तुटकी वा उमललेल्या दोन फुलांचं मार्केट वाढलं.
फिल्मी रोमान्स वरून आठवलं.
हातात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरण्यापूर्वी मेहमूदची एक मुलाखत टीव्हीवर लागली
होती. त्यात मेहमूद अपने टिपिकल अंदाज में ' आराधना ' मधील ' रूप तेरा मस्ताना '
ची पडद्यामागील स्टोरी सांगत होता. त्या गाण्याच्या म्युझिकमध्ये, शब्दांमध्ये,
गायकाच्या आवाजात, इव्हन सिच्युएशनमध्ये रोमान्स, सेक्स पुरेपूर भरला असूनही राजेश
खन्ना काहीच करू शकला नाही व कॅमेरा नुसताच शर्मिला- राजेश भोवती गोलगोल फिरू
लागला. मला प्रश्न पडला, राजेशनं काय करायला पाहिजे होतं ?
आता त्याच्या अभिनयाच्या
मुळच्याच मर्यादा. त्यात समोर अर्धवस्त्रांकित असली तरी शर्मिला टागोर. जिला
कोणत्याही अँगलनं हॉट न् सेक्सी म्हणता येत नव्हतं. ( हिला काश्मीर कि कली कोणी
बनवलं रे ? ) अशा स्थितीत राजेश खन्ना होता म्हणून थोडा तरी रोमान्स, मेहमूदच्या
भाषेत सेक्स तिथ अवतीर्ण झाला. मी असतो तर एक टक्काही काही झालं नसतं. शर्मिला
टागोर आपल्या आख्ख्या फिल्मी करियरमध्ये एकदाच चांगली दिसली. ती पण ' अब के सजन
सावन में ' गाण्यात. त्यातही लताच्या आवाजाची साथ होती म्हणून !
फिल्मी रोमान्स वरून आठवलं.
तुम्ही कधी फिल्मी रोमान्सचं शुटींग पाहिलंय का ? युट्युबवर बी, सी ते वायझेड
मुव्हीजच्या रोमँटिक सीन्सचे शूट उपलब्ध आहेत. जरूर बघा. प्रत्येक सेकंदाला हीरोला
निदान चार शिव्या घातल्याखेरीज रोमँटिक सीन शूट होत नाही असा बव्हंशी डायरेक्टरचा
समज असतो. नटीचा हात हातात घेताच " अबे चुतीये " पासून स्टार्ट होत
किसिंग सीन " मादरचोद, भेन्चोद " वर येऊन संपणार.
पाठीमागून शिव्या न्
बाहुपाशांत त्यातल्यात्यात बऱ्यापैकी अॅक्ट्रेस. साला, कोणता हिरो रोमँटिक फील
चेहऱ्यावर आणेल ? ते भोजपुरी वगैरे तर कसायाच्या हातात गेलेल्या बकऱ्यागत चेहरे
करतात. दुसरं एक्स्प्रेशनचं येत नाही त्यांच्या चेहऱ्यावर. आणि आम्ही मात्र शूट
झाल्यावर यांच्या सोबतची भरगच्च, सेक्सी नटी पाहिल्यावर लँगूर
के मुंह में अंगूर म्हणत फ़िल्मी कलियाँ खिलवत बसतो !
रोमान्स शूट से याद आया. साउथ इंडियन सिनेमातला रोमान्स
जगाच्या पाठीवर कुठेही पहायला मिळणार नाही. तिथं हिरॉइनला गॅस, तवा, फ्रीज तसेच
फळं चुरगळून खाण्याचं सामान वगैरे म्हणून काहीही दाखवतात. एका पिक्चरमंदी
प्रभुदेवा नग्माच्या पोटावर ऑम्लेट बनवतो. नग्माचं पोट आणि गॅस वा तवा यातला फरक न
समजणारा कोण तो येडझवा होता, काय म्हायती ! हिंदुस्थानी मध्ये ' टेलिफोन धून में हँसने
वाली ' म्हणत कमल हसन मनीषाच्या कमरेवर तबला वाजवण्याची अॅक्टिंग करतो. मनीषा व
तबला. कधी कधी मोठ्या माणसांना फरकच कळत नाही. दुसरं काय ! पण सफारीतला संजय दत्त
जुहीच्या पोटावर आईस्क्रीम ठेवून खातो असं दाखवलंय. आता जुहीचं पोट म्हणजे काय
आईस्क्रीम प्लेट वाटली कि आईस्क्रीम जास्त जमलं होतं म्हणून ते वितळवण्यासाठी
जुहीच्या पोटावर ठेवण्यात आलं ते डायरेक्टरच जाणे !
हिरॉइनच्या पोटाचा, विशेषतः नाभीचा कसा वापर केला जाईल याचा निदान
फिल्मी दुनियेत भरवसा नाही. उदाहरणार्थ परत एकदा कमल हसन. ' एक दुजे के लिए ' मध्ये
रती अग्नीहोत्रीचं पोट त्याला भोवरा फिरवण्यासाठी योग्य वाटलं. बरं हा काही एकमेव
महाभाग आहे किंवा ती दुदैवी आहे अशातला भाग नाही. सेम सीन विजयाशांती सोबत एका
कन्नड ( तेलुगु, तमिळ, मल्याळम सगळं आपल्या लेखी कन्नडचं ) फिल्म मध्ये शूट झालाय.
बाकी, हिरॉइनच्या नाभीमध्ये पाणी, मध, दुध, तेल, द्राक्षं,
चेरी जे काय मिळेल ते कोंबून भरण्यापलीकडं दाक्षिणात्यांची मजल गेली नाही. गरीब
बिचारे ! तिकडं जेम्स बॉंडने तर आपल्या नटीच्या नाभीत हिरे भरले. तेही प्रत्येक
हिरा पाण्याच्या थेंबाएवढा. हिरॉइन Halle Berry.
जर ते हिरे खरे असले तर एखाद दुसरा तिला निश्चितच मिळाला असेल असं मला उगाचंच
वाटून राहिलंय. त्यामानानं हिंदीत अपवादात्मक सीन वगळल्यास असलं काही शूट झालं
नाही. तसंही बरोबर आहे म्हणा. माधुरी दीक्षित सारख्यांसोबत हिरे भरायचे सीन करायचे
म्हटल्यावर निर्माता कंगाल होईल. ... ईईई
.. बकवास जोक. खैर, फिल्मी प्रेक्षकांचं --- म्हणजे इतरांचं माहिती नाही पण
आपल्याला --- म्हणजे पर्सनली आपल्याला खोलगट नाभी असलेल्या नट्या आवडतात. का
नट्यांची खोलगट नाभी आवडते ? जे असेल ते पण मुद्दा समजल्याशी मतबल. तर
अस्मादिकांनी लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या पत्नीला असा प्रश्न विचारून चार शिव्या
खाऊन एक कान अंमल बधीर करून घेतल्याची एक दुखरी, बहिरी जुनी आठवण येथे नमूद करत
लेख समाप्त करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा